Kalyan Attack News SaamTv
Video

VIDEO : पाठलाग करून तरुणावर चॉपरने हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद

Kalyan News : वसंत व्हॅली रोड परिसरात एक तरुणावर जुन्या रागातून चॉपरने हल्ला करण्यात आला आहे. त्याचा पाठलाग करून मग हा हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Saam Tv

कल्याण पश्चिम वसंत व्हॅली रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. चॉपर हातात घेऊन एका तरुणाचा पाठलाग करून हल्ला करण्यात आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्यात सत्कार भोईर नावाचा तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. तर हल्लेखोर आर्यन पाटील असे हल्लेखोराचे नाव आहे.

कल्याण पश्चिम वसंत व्हॅली रोडवर चॉपरने एका तरुणाला जखमी करण्यात आलं आहे. आधी या तरुणाचा पाठलाग करण्यात आला, नंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हा सर्व प्रकार परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी मुलींना उपचारासाठी सत्कार भोईर या तरुणाने नेले होते. तसेच अपघात करणाऱ्या गाडी चालकाचे नाव सांगितल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर आर्यन पाटील सह त्याच्या तिने ते चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT