Chikhaldara waterfall Saam TV
Video

Chikhaldara : चिखलदऱ्याचं निसर्गसौंदर्य खुललं! भीमकुंड धबधब्याचं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य | VIDEO

Bheemkund Waterfall : पावसाळा सुरु होताच चिखलदऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. खास करून भीमकुंड धबधब्याचं नजारे पाहण्यास हजारो पर्यटक गर्दी करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरू होताच संपूर्ण विदर्भात निसर्गाने आपली उधळण सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. विशेषतः भीमकुंड धबधब्याच्या अद्भुत नजाऱ्यांसाठी हजारो पर्यटक येथे दाखल होत आहेत.

सध्या चिखलदऱ्यात घनदाट जंगल, गडद धुके, सतत वाहणारा पाऊस आणि धबधब्याचा प्रचंड जलप्रवाह असे निसर्गसौंदर्य पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहताना पर्यटक भारावून जात आहेत. भीमकुंड धबधब्याचा आवाज आणि त्याच्या आसपासचा थरारक निसर्ग वातावरण भारावून टाकत आहे.

पावसाळी पर्यटनासाठी चिखलदरा हे ठिकाण सध्या अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. येत्या काही आठवड्यांत पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या पर्यटकांसाठी चिखलदरा हे स्वर्गच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT