AMC’s JCB demolishing a dangerous building in Anguribagh as part of the ongoing anti-encroachment operation in Sambhajinagar’s old city area. saam tv
Video

छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहीम वेगात; धोकादायक इमारती महापालिकेकडून जमीनदोस्त|VIDEO

AMC demolishes illegal shops: छत्रपती संभाजीनगरातील रंगारगली व अंगुरीबाग भागातील धोकादायक इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पैठण रोडवरही मार्किंग करण्यात आले असून कारवाई वेगाने सुरू आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर शहरातील जुन्या भागात असलेल्या रंगारगल्ली, अंगुरीबागेत धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. त्याशिवाय अतिक्रमण हटाव मोहिमेला शनिवारपासून सुरुवात होणार असल्याने पैठण रोडला मार्किंग करण्यात आले आहे.

सध्या महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू आहे. अंगुरीबागेतील धोकादायक इमारत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काल दुपारी पाडली. दुसऱ्या पथकाने याच वेळी रंगारगल्लीत रस्त्यात वाहतुकीला अडसर ठरणारी तीन दुकाने जेसीबीने जमीनदोस्त केली.

महापालिका दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटीस बजावते. मात्र इमारत मालक याकडे दुर्लक्ष करतात. अनेक ठिकाणी भाडेकरू आणि मालक यांच्यात वाद आहेत. रंगारगल्ली येथील एक धोकादायक इमारत मनपाने मंगळवारी जमीनदोस्त केली. काल मनपाचे पथक अंगुरीबागेत दाखल झाले. रमेश गुगळे यांची इमारत धोकादायक बनली होती. या इमारतीचा वापरही बंद होता. इमारतीसमोरील रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद करून दोन जेसीबीने इमारत पाडण्यात आली. गुलमंडी ते सिटी चौक रस्त्यावर रंगार गल्लीत जागेचा मोबदला घेऊनही अतिक्रमणे केली होती. मंगळवारी तीन व्यापाऱ्यांनी साहित्य काढून घेण्यासाठी वेळ मागितला होता. बुधवारी तिन्ही दुकाने हटविण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT