Abdul Sattar Saam TV
Video

Sambhajinagar : संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ३ दिग्गजांचे अर्ज बाद, सत्तारांना धक्का | Video

Sambhajinagar District Bank Election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी २१ संचालक पदांसाठी २१४ उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज छाननीत ११३ वैध, ४५ बाद झाले आहेत.

Namdeo Kumbhar

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकूण २१ संचालक पदांसाठी तब्बल २१४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यातील ११३ अर्ज वैद्य आणि ४५ बाद आहेत. कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांचा अर्ज बाद झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तब्बल २१४ अर्ज दाखल झाले असल्याने आज होणाऱ्या अर्ज छाननीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुतीतूनच सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांसह आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर आणि पालकमंत्री शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

SCROLL FOR NEXT