Chhagan Bhujbal warns against Manoj Jarange’s demand for Maratha reservation under OBC quota Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली, तर समाज उठल्याशिवाय राहणार नाही – छगन भुजबळ|VIDEO

Chhagan Bhujbal Warns Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी इशारा दिला आहे की, ओबीसी आरक्षणात जर कोणी हस्तक्षेप केला तर ओबीसी समाज शांत बसणार नाही.

Omkar Sonawane

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे येत्या 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे मोर्चा घेऊन येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका करत अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत म्हणजे पुन्हा संघर्ष होणार, पण संघर्ष नेमका कोणाशी होणार? ओबीसी समाजाची संख्या महाराष्ट्रात 54 टक्के आहे. बिहारमध्ये जातगणनेनंतर 63 टक्के ओबीसी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 54 टक्क्यांच्या अर्धे आरक्षण आम्हाला मिळायला हवे.

ते पुढे म्हणाले की,

ओबीसीमध्ये 374 जाती आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के वेगळे आरक्षण दिले आहे. ते आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.

विद्यार्थ्यांना ज्या सुविधा हव्या होत्या त्या सारथी संस्थेमार्फत दिल्या गेल्या आहेत. उलट ओबीसींपेक्षाही जास्त गोष्टी मराठा समाजाला देण्यात आल्या आहेत.

उगाच गर्दी करून काही मिळणार नाही, उलट अडचणी वाढतील. जरांगे हे हे सर्व का करतात हे मला माहीत नाही."

भुजबळांनी स्पष्ट केले की, चार आयोगांनी मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही असे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टानेही 80 पानी निकाल देऊन तेच सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. शेवटी भुजबळांनी इशारा दिला की,

ओबीसींच्या आरक्षणातून जर कोणी आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला, तर ओबीसी समाजही जागृत आहे. जोपर्यंत सरकार सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही बघतो आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT