Chhagan Bhujbal On HallTicket SaamTv
Video

Chhagan Bhujbal : हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; छगन भुजबळ, नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया | Video

HSC - SSC Hallticket : दहावी - बारावी परीक्षांच्या हॉलतिकिटावर केलेल्या जातीच्या उल्लेखावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

दहावी आणि बारावी परीक्षांच्या हॉलतिकिटावर आता थेट जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉलतिकिटावरती जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता याबद्दल राजकीय वर्तुळातून देखील याबद्दल टीका केली जात आहे. छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी या प्रकरणावरून शिक्षण विभागावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, फुले-शाहू-आंबेडकरांना मानणारे अनेक राज्यकरते आहेत. त्यांनी याबाबत लक्ष द्यायला पाहिजे. जसं की आपण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आल्यावर जात धर्म विसरून दर्शन घेत असतो, त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारात आणि सरकारी व्यवहारात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी बोलताना दिली आहे.

तर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर आणि शिक्षण विभागावर निशाणा साधला आहे. सरकारच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे. शाळेत प्रवेश घेत असताना कागदपत्रांवर या सगळ्या बाबींचा उल्लेख असतो त्यावरच त्यांचं शिक्षण होतं. या पद्धतीने छोट्या जातीचे लोक कोण आहे? उच्च वर्णीय कोण आहे? या आधारावर सरकारला परीक्षा घ्यायच्या असतील त्यातून कमी जातीच्या मुलींना नापास करता येईल का? हा प्रयोग होऊ शकतो. बोर्ड वेगळे उदाहरण देत आहे, बोर्डामध्ये अशी लोकं कशाला ठेवतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच यावर बोर्डाने दिलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, बोर्ड असं उत्तर देत असेल, तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहास हे कधी झालं नाही. जातिवादी सरकार महाराष्ट्रात आल्याने त्यांना तुकडे पाडायचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये हा प्रयोग करत आहे का अशी शंका मनात आहे. नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना जात आणि त्या पलीकडे जाऊन शिक्षण घेण्याची सवय झाली आहे. यांच्यातच भेद पडायची हे सरकारचं कृत्य असले पाहिजे अशी आमच्या मनात शंका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT