Parents and young chess players protest against mismanagement during the national-level chess tournament at Himalaya Public School, Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

देशभरातून आलेल्या २४० खेळाडूंची फसवणूक? संभाजीनगरात बुद्धिबळ स्पर्धेवरून खळबळ|VIDEO

National Chess Tournament Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान मोठी फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे. देशभरातून आलेल्या २४० खेळाडू आणि पालकांचा संताप, वाईट व्यवस्थापन, राहण्याची आणि पाण्याची सुविधा नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

Omkar Sonawane

माधव सावरगावे, साम टीव्ही

देशभरातून आलेल्या बुद्धिबळ खेळाडू आणि पालकांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हिमालया पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान पालक आणि खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्पर्धेत देशातील वेगवेगळ्या राज्यांतून तब्बल २४० खेळाडू सहभागी झाले आहेत. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा होणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली होती.

मात्र अचानक पुढील फेरी रद्द करण्यात आल्याने खेळाडू आणि पालक संतप्त झाले आहेत. यावेळी पालकांनी साम टीव्हीशी संवाद साधला. स्पर्धेच्या ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था पिण्याच्या पाण्याची आणि राहण्याची कोणतीही सुविधा नाही, अशा अत्यंत वाईट व्यवस्थेमध्ये मुलांना खेळावे लागत आहे.

याशिवाय आयोजकांनी पालकांकडून मोठी फी आकारूनही राहण्याची व्यवस्था केली नाही, अशी तक्रार पालकांनी केली आहे.दरम्यान, या सर्व गोंधळानंतर छत्रपती संभाजीनगर बुद्धिबळ असोसिएशनने जबाबदारी नाकारत हात वर केले आहेत. पालकांनी झालेल्या खर्चासह फी परत देण्याची मागणी केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतुकीवरील तात्पुरते निर्बंध

Jammu and Kashmir: उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह, खिशात सापडली सुसाइड नोट

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबवा! बनावट रोजगार ॲप्सवर राम शिंदेंचा कडक इशारा|VIDEO

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT