Chandrashekhar Bawankule surprise raid in Nagpur Sub-Registrar office Saam Tv
Video

Chandrashekhar Bawankule: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुय्यम निबंधक कार्यालयात धाड; अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये सापडले पैशांचे बंडल|VIDEO

Bawankule Exposes Corruption In Khamala Office: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाड टाकली. अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये पैशांचे बंडल सापडल्याने कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला.

Omkar Sonawane

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील खामला येथे असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक जाऊन कार्यालयाची झाडाझडती टाकली. यावेळी त्यांना एका अधिकाऱ्याच्या ड्रॅावरमध्ये पैसे सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महत्वाचे म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार देखील असल्याने हा सगळा होणारा भ्रष्टाचार सर्व महराष्ट्राने बघितला. बावनकुळे यांना या कार्यालयाची तक्रार आली होती.

अनेक गैरप्रकार या कार्यालयात होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याने मी येथे आलो अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तर हे पैसे ड्रॅावरमध्ये कसे आले याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांना बोलवण्यात येईल आणि कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच त्यांनी आपला फोन नंबर देखील सर्व माध्यमांसामोर सांगितला. पाहा त्या संदर्भातील व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

SCROLL FOR NEXT