कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

Chandrashekhar Bawankule Statement On Maratha Kunbi Certificates: मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरनंतर वाढलेल्या चर्चेत, ओबीसी उपसमिती बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रांवर कडक पडताळणीचे निर्देश दिले. नियमाप्रमाणे असलेल्या लोकांना कोणताही आक्षेप नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणावरून कलगीतुरा रंगला आहे. मराठा समाजासाठी आरक्षणासाठी घाला येतोय. ओबीसीच्या वाट्यांच आरक्षण जात, असे ओबीसी समाजाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. आज ओबीसी उपसमितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित पार पडली. यानंतर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधला.

आज झालेल्या या बैठकीत ओबीसीच्या संदर्भातील 18 ते 19 वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या संदर्भातील जात प्रमाणपत्र देताना कोणत्याही पद्धतीत कागदपत्रावर खाडाखोड होते हे सांगितले. तसेच जे कोणी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नियमाप्रमाणे आहेत त्याबाबतही चर्चा झाली. चुकीच्या पुराव्यांवर प्रमाणपत्र दिले जाऊ नये. कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच देण्यात आले पाहिजेत या विषयांवर चर्चा झाली आणि जे नियमाप्रमाणे आहेत त्यांना कोणाचाही आक्षेप नाही असे बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com