Police escort the accused mastermind in the Chandrapur kidney trafficking case after his arrest in Solapur. Saam Tv
Video

चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य सूत्रधाराला सोलापुरातून अटक|VIDEO

Cambodia Kidney Sale Case: चंद्रपूर किडनी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार सोलापूरमधून अटकेत. कंबोडियात किडनी विक्री, सोशल मीडियाचा वापर आणि बहुराज्यीय रॅकेटचा मोठा खुलासा पोलिस तपासात झाला आहे.

Omkar Sonawane

संजय तूरमुर, साम टीव्ही

किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले आहे. ज्याच्या माध्यमातून रोशन कुडे या शेतकऱ्याने कंबोडियात किडनी विकली. तो डॉ. कृष्णा पोलिसांच्या हाती लागला आहे. कृष्णा हे नाव धारण करून तो सोलापुरात वास्तव्यास होता. त्याला तिथून पकडण्यात आले आहे. त्याचे मूळ नाव मल्लेश सांगितले जात आहे. फेसबूक पेजच्या माध्यमातून रोशन त्याच्या संपर्कात आला. व्हॉट्सॲप चॅट आणि फोनच्या माध्यमातून हे दोघे संपर्कात होते. त्यानेच रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि मोबदल्यात आठ लाख मिळतील, असे सांगितले. रोशन कंबोडियाला जाण्यापूर्वी त्यांची पहिली भेट कोलकाता इथे झाल्याचे सांगितले जाते.

आरोपी कृष्णा हाही कपडा व्यवसायात अपयशी ठरला होता आणि त्यानेही आपली किडनी विकली, हे विशेष. तो डॉक्टर म्हणून वावरत असला तरी मुळात तो इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात हे रॅकेट सक्रिय असतानाच महाराष्ट्रात चंद्रपूर आणि नाशिकनंतर आता सोलापूरचे नाव समोर आले. त्यामुळे हे रॅकेट आणखी किती ठिकाणी पसरले आहे, याचा शोध सुरू असून, आरोपी कृष्णा हा त्यासाठी मोठा आधार ठरणार आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणाने बाथरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; अचानक गर्लफ्रेंडला प्रचंड रक्तस्त्राव, पुढील काही क्षणात मृत्यू

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidityची समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

Maharashtra Politics: पुण्यात भाजपनं पुन्हा खिंडार पाडलं, मविआचे अनेक दिग्गज नेते हाती घेणार 'कमळ'

SCROLL FOR NEXT