politics  saam tv
Video

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला जबर धक्का; हा बडा नेता शिवबंधन सोडणार|VIDEO

Setback for Uddhav Thackeray: डबल केसरी महाराष्ट्र पैलवान चंद्रहार पाटील हे उद्या धनुष्यबाण हात घेणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

Omkar Sonawane

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही.

सांगलीमधील चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे समोर आले आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी चंद्रहार पाटलांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. तर शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. काँग्रेससोबत वाद घालून सांगलीची जागा खेचून आणली होती, तेच चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT