Mahindra Company Chakan MIDC SaamTv
Video

Chakan News : चाकण MIDC मधला आणखी एक मोठा उद्योग गुजरातला जाणार ?

Chakan MIDC Update : चाकण MIDC मधील 50 कंपन्या सुविधा मिळत नसल्याने स्थलांतरित होत आहेत. त्यात अनेक मोठे उद्योग असल्याने रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Saam Tv

चाकण MIDC मधून महिंद्रा कंपनी गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे. चाकण MIDC मधील 50 कंपन्या पायाभूत सुविधा मिळत नाही म्हणून स्थलांतरित झाल्या असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

चाकण MIDC देशातील बहुचर्चित MIDC म्हणून ओळखली जाते. आता कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी चाकण MIDC म्हणून 50 कंपन्या पायाभूत सुविधेच्या अभावाने इथून स्थलांतरित झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता या कंपन्यांमध्ये महिंद्रा कंपनीचा देखील समावेश असून ही कंपनी गुजरातला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव बटवाल यांनी जयराम रमेश यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हंटल आहे. चाकण MIDCमध्ये बऱ्याच समस्या आहेत. त्यामुळे काही वर्षात अनेक कंपन्या वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. आता महिंद्रा कंपनीसुद्धा गुजरातला जात असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. असं सचिव बटवाल यांनी म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pm Modi: बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं; औरंगाबादच्या नामकरणावरून पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Shirdi News : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी..फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली; तीन वर्षानंतर वाहता येणार समाधीवर फुले

Sprout Benefits: मटकी खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Dev Deepawali 2024: कधीये देव दिवाळी? वाराणसी आणि देव दिवाळीचा संबंध काय?जाणून घ्या

IND vs AUS: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

SCROLL FOR NEXT