Central Railway Saam TV
Video

Central Railway : वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेचा दिलासादायक निर्णय, आषाढी वारीसाठी ८० विशेष रेल्वेगाड्या|VIDEO

Pandharpur Vitthal Rukhmini Mandir : वारी काळात वाढत्या गर्दीचा विचार करुन मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. वारीच्या काळात अनारक्षित गाड्यांचे फेरे सुरू राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून मोठी सुविधा देण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारच्या राज्यांमधून येतात. त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवण्यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून १ ते १० जुलै दरम्यान ८० जादा विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे.

या विशेष गाड्या मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटक या भागातून पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी असतील. रेल्वेप्रशासनाने वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून अनारक्षित डब्यांच्या गाड्यांचेही अतिरिक्त फेरे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारीच्या काळात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवता येईल, तसेच हजारो भाविकांना वेळेवर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zohran Mamdani: अमेरिकेत राजकीय उलथापालथ, भारतीय वंशाच्या नेत्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का, नेमकं प्रकरण काय?

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळले, ४ जणांचा मृत्यू; काळाकुट्ट धूर अन् आगीचे उंच लोळ, थरारक व्हिडिओ व्हायरल

अजितदादांची जय पवारांसाठी 'पॉवरफुल' खेळी?जय पवार होणार बारामतीचे कारभारी?

SCROLL FOR NEXT