CBSE open book assessments  Saam TV News Marathi
Video

पुस्तक घेऊन परीक्षेला बसा, CBSE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

CBSE TO INTRODUCE OPEN BOOK EXAMS FOR CLASS 9 STUDENTS FROM 2026-27 : CBSE ने इयत्ता ९ साठी खुली पुस्तक परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला.२०२६-२७ पासून भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी ही पद्धत असेल.

Namdeo Kumbhar

CBSE open book assessments for class 9 from academic year 2026-27 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून खुल्या पुस्तक परीक्षा (Open Book Assessments - OBA) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट (NCFSE) २०२३ यांच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.

CBSE ने २०२३ मध्ये केलेल्या पथदर्शी प्रकल्पात इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांवर या पद्धतीची चाचणी घेतली. यात विद्यार्थ्यांचे गुण १२% ते ४७% पर्यंत नोंदवले गेले, तर शिक्षकांनी या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. CBSE लवकरच मानक नमुना प्रश्नपत्रिका आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. ही प्रणाली ऐच्छिक असेल, मात्र शाळांना याची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

Open Book Assessments मुळे रट्टा मारण्याऐवजी संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर दिला जाणार आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत, भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या मुख्य विषयांसाठी प्रत्येक सत्रात तीन लेखी मूल्यमापनात OBA समाविष्ट असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाठ्यपुस्तके आणि इतर संदर्भ साहित्य वापरण्याची मुभा असेल. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन, वास्तविक जीवनातील समस्यांवर आधारित विचारक्षमता वाढेल, असा दावा CBSE ने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update: अंगारकी चतुर्थीनिमित्त अथर्वशीर्ष पठण आरती

SCROLL FOR NEXT