Maharashtra New Governer:  Saamtv
Video

VIDEO: 'सी पी राधाकृष्णन' महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, ९ राज्यांचे राज्यपाल बदलले

Maharashtra New Governer: सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल असतील. रमेश बैस यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. पी राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशातील ९ राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे आहेत नवे राज्यपाल!

  • जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  •  ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  •  संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  •   रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  •  सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  • सी. पी. राधाकृष्णन , झारखंडचे राज्यपाल, तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार, यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

  •   आसामचे राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती

  • लक्ष्मण प्रसाद आचार्य, सिक्कीमचे राज्यपाल, आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तर त्यांना मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे

  • राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT