Devendra fadanvis on khokya  Saam Tv
Video

Satish Bhosale: खोक्याच्या घरावर बुलडोझर फडणवीसांची प्रतिक्रिया, VIDEO

Devendra Fadnavis Warns Criminals: सतीश भोसले उर्फ खोक्याचा आज पोलिसांनी माज उतरवला आहे. वनविभागाच्या जागा बळकावून खोक्याने तिथे बंगला बांधला होता. हा संपूर्ण बंगला बुलडोझरद्वारे जमीनदोस्त केला असून यावर फडणवीसांनी गंभीर इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभाग बुलडोझर फिरवलाय. खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली आहे. या आधी वनविभाने नोटीस पाठवली होती. मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी धारदार शस्त्रं, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बोक्या,खोक्या किंवा ठोक्या असो कुणालाही सोडणार नाही या सगळ्यांना ठोकणार असा इशारा त्यांनी राज्यातील गुंडांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

Bridal Makeup Tips at Home: घरीच करा ट्राय करा सुंदर ब्रायडल मेकअप, या ७ सोप्या टिप्सने मिळवा परफेक्ट ब्रायडल लूक

Eyebrow Shape Tips: आयब्रो केल्यानंतर २ दिवसांत लगेचच बदलतो शेप; या 5 सोप्या मेकअप टिप्स लगेचच करा फॉलो

Lockdown: शाळा-कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना WFH; भारताशेजारील देशात लॉकडाउन

धक्कादायक! नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला कपडे फाटेपर्यंत मारले, ७-८ जणांनी खाकीवर उचलला हात, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT