Buldhana News SaamTv
Video

Buldhana News : बुलढाण्यात टक्कल व्हायरस; आरोग्य विभागाकडून उपाययोजनेची नागरिकांची मागणी | Video

Baldness Virus Outbreak : बुलढाण्यात टक्कल व्हायरसने थैमान घातलं आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

Saam Tv

बुलढाण्यात टक्कल व्हायरसने थैमान घातलं आहे. या आजारामुळे तीन दिवसात नागरिकांना टक्कल पडत आहे. बुलढाण्यातल्या कळवण, हिंगणा, बोंडगाव या गावात या टक्कल व्हायरसने थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. यामुळे आत्तापर्यंत शेकडो लोकांच्या डोक्याला टक्कल पडलं आहे. आधी डोक्याला खाज येते, नंतर केस गळताय, आणि त्यानंतर अगदी तिसऱ्या दिवशी माणसाला टक्कल पडत आहे. विशेष म्हणजे महिलांची संख्या देखील यात लक्षणीय आहे. शाम्पू वापरला म्हणून टक्कल पडत असल्याचं काही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र शाम्पू वापरलाच नाही अशा लोकांचे देखील केस जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावात आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती. कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावात केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांना निवेदन दिले आहे. आता सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे नागरीक डोळे लावून बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT