Latur SAAM TV
Video

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

Borvati Village News : भूकंपाच्या धक्क्यांनी लातूर मधील बोरवटी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी ६ : १३ वाजता जमिनीतून दोनदा मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूरपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरवटी गावात आज सकाळी ६ : १३ वाजता जमिनीतून दोनदा मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे. या आवाजामुळे ग्रामस्थ घाबरुन घराबाहेर पडले असून संपूर्ण गाव रस्त्यावर आले. प्रशासनाकडून या आवाजाबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

तसेच, नागरिकांच्या मनात १९९३ मधील किल्लारी भूकंपाची आठवण जागी झाली असून पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मुरुड अकोला व बडूर उस्तुरी भागात सौम्य भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. त्यामुळे बोरवटीतील आजचा आवाज भूकंपाशी संबंधित आहे का? हा संभ्रम अद्याप कायम आहे.नेमका हा आवाज कशामुळे झाला याची खात्री पटलेली नसली तरी गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT