Mumbai Ganeshotsav Saam TV
Video

Mumbai Ganeshotsav : मुंबई गणेशोत्सव मंडळांना महापालिकेचा मोठा झटका, खड्डा खोदल्यास १५ हजार रुपये दंड | VIDEO

Mumbai BMC festival Policy : मुंबई महापालिकेनं यंदा गणेशोत्सव मंडळांवर मोठा दंड लागू केला आहे. रस्त्यावर मंडपासाठी खड्डा खोदल्यास प्रत्येक खड्ड्यामागे तब्बल 15 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांना महानगरपालिकेच्या नव्या नियमांचा फटका बसणार आहे. मुंबई महापालिकेनं यंदा गणेशोत्सव मंडळांवर मोठा दंड लागू केला आहे. सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास मुंबई महानगरपालिका प्रत्येक खड्ड्याच्या बदलात तब्बल १५ हजार रुपये दंड आकारणार आहे. मागील वर्षी हा दंड केवळ २ हजार रुपये होता. त्यामुळे यंदा तो साडेसात पटीनं वाढ झाला आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक मंडळांनी या दंडाच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला असून, तात्काळ हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांना परवानग्या, अटी आणि आर्थिक बोजामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता वाढीव दंडामुळे मंडळांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT