Thane Municipal Election Results BJP Shinde Sena saam tv
Video

BJP - Shinde Sena : महापालिका निवडणूक निकालानंतर मोठी घडामोड; भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता

TMC Election Result : ठाण्यात महायुती तुटण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक निकालानंतर मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. योग्य मान-सन्मान मिळाला नाही तर विरोधी बाकावर बसू, असं सूचक विधान भाजप आमदार संजय केळकर यांनी केलं.

Nandkumar Joshi

एकसंध शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भरघोस यश मिळवलं. तर भाजपला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. शिंदेसेनेनं ७५ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर युतीत असलेल्या भाजपला अवघ्या २८ जागांवरच समाधान मानावं लागलं. पण येत्या काही दिवसांत मोठी घडामोड घडणार असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाण्यात शिंदेसेनेचीच हवा असल्याचे महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं. मुंबईत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडं शिंदेसेनेने महापौरपद हवं आहे, अशी इच्छा व्यक्त केली असतानाच, ठाण्यात भाजपनं काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे. योग्य मान सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करण्यात येईल, असे भाजप आमदार संजय केळकर म्हणाले. उचित सन्मान न मिळाल्यास विरोधी बाकावर बसू, असा सूचक इशाराही केळकरांनी दिलाय. सत्तेवर अंकुश ठेवणेही महत्वाचे असते, वेगळा विचार करू, असेही केळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT