Ladki Bahin Yojana  Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या नावाखाली भाजपची सदस्य नोंदणी; स्थानिक महिलांचा आरोप, कुठे घडला प्रकार? VIDEO

Ladki Bahin Yojana Latest News : 'लाडकी'च्या नावाखाली भाजपची सदस्य नोंदणी केल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. असा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. नांदेडमधील प्रकारानंतर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

भाजपची सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी नवीन फंडा शोधून काढला आहे. 2100 रुपये खात्यात जमा होणार म्हणून भाजपचे सदस्य बनवले जात आहेत. नांदेड शहरातील सांगवी भागात हा प्रकार घडला आहे. असा गंभीर आरोप स्थानिक महिलांनी केला आहे.

राज्यात भाजपसह महायुती सत्तेत आली. सतेत येण्यासाठी लाडक्या बहिणींचा मोठा सहारा महाविकास आघाडीला मिळाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केली. आज सदस्य नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याने नांदेड शहरासह जिल्ह्यात भाजपाने मोठे कॅम्प लावून सदस्य नोंदणी अभियान राबविले. परंतु सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपने एक शक्कल लढवली.

लाडक्या बहिणीला 2100 रुपय येणार, असे सांगून भाजपा लाडक्या बहिणींची सदस्य नोंदणी करून घेतल्याचा प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेड शहरातील सांगवी भागात भाजपाने सदस्य नोंदणी कॅम्प लावले होते. या ठिकाणी 2100 रुपये येणार या आशेवर लाडक्या बहिणींची भाजप सदस्य नोंदणी कॅम्पवर मोठी गर्दी केली. भाजपाने सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी असाही फंडा राबवला, अशी चर्चा परिसरात पसरली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

SCROLL FOR NEXT