Shreya Maskar
सध्या दरमहिना पात्र महिलांना 'लाडकी बहीण योजना' अंतर्गत 1 हजार 500 रुपये दिले जातात.
मिळालेल्या पैशांची गुंतवणूक करण्याआधी ती किती काळासाठी करावी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
लाडक्या बहिणींनो सर्वात आधी हे लक्षात घ्या की, गुंतवणुकीचा काळ गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून असतो.
कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
सर्वसाधारणपणे, जास्त फायदा मिळवण्यासाठी 5 ते 10 वर्षे विश्वासू योजनेत पैसे गुंतवणे योग्य रहील.
गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी ठेवी परताव्याची किंमत जाणून घ्यावी.
गुंतवणूक तुम्ही लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशाप्रकारे करू शकता.
आपली आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक गरज लक्षात घेऊन गुंतवणुकीचा काळ ठरवावा.