Police intervene as BJP supporters allegedly disrupt former mayor Pratibha Patil’s public meeting in Bhiwandi’s Ward No.1. Saam Tv
Video

महिला उमेदवाराच्या सभेत भाजप आमदाराच्या समर्थकांचा मोठा राडा आणि शिवीगाळ|VIDEO

BJP Supporters Disrupt Woman Candidate: भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये महिला उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत भाजप आमदार महेश चौघुले समर्थकांनी घुसखोरी करत शिवीगाळ व गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार महेश चौघुले समर्थकांचा कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत पोलिसांच्या उपस्थिती मध्ये राडा घालण्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपने पॅनल उभे केले आहे.

भाजप आमदार महेश चौघुले विरोधात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून या दोन गटात वाद आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप आमदार महेश चौघुले यांनी भाजपचे पॅनल उभे केले असून यामध्ये त्यांचा मुलगा मित चौघुले निवडणुकीच्या रिंगणात आहे.

माजी महापौर प्रतिभा पाटील यांची महिलांसोबत कोंबडपाडा गणपती मंदिर येथे सभा सुरू असताना आमदार महेश चौघुले समर्थकांनी सभेत घुसून महिलांना शिवागळ करत राडा घातला. यानंतर सभेतील महिलांनी विरोधकांना तुम्ही या ठिकाणी का आले याचा जाब विचारला. त्यानंतर प्रतिभा पाटील आणि महिला समर्थकांसह निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी दाखल झाल्या. मात्र पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करत असल्याने नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप आमदार महेश चौघुले यांनी प्रथमच या प्रभागात पुत्र मित चौघुले सह भाजपचे पॅनल उभे केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने हा प्रभाग कोणार्क विकास आघाडीसाठी सोडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT