Uddhav Thackeray welcomes former BJP corporator Sangeeta Gaikwad into Shiv Sena (Thackeray faction) at Matoshree, Mumbai. Saam Tv
Video

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

Uddhav Thackeray Speech At Matoshree: भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी पतीसह शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (ठाकरे गटात) प्रवेश केला. मातोश्रीवरील या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी "नरकासुराचा वध करण्यासाठी आला" असा टोला लगावला.

Omkar Sonawane

भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी त्यांच्या पतीसह शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. संगीता गायकवाड नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20च्यामाजी नगरसेविका असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड हे निवडणूक लढवणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्याविरुद्ध ही निवडणूक होणार आहे. पक्ष प्रवेश होताच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

यांना मिरच्या का झोंबतात? नळबाजार, भिवंडीत जाऊन विचारा!; राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा काढताच नितेश राणेंचं टीकास्त्र

Maharashtra Live News Update: वाशिम अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एकजण ठार

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT