Atul Save SaamTv
Video

BJP Atul Save : सरकार महायुतीचंच येणार! भाजप उमेदवार अतुल सावेंनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Assembly Election Results Update : गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने विकासाची कामं केली आहेत. जनतेचा कौल आम्हालाच आहे, असा विश्वास भाजपच्या अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

Saam Tv

गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने राज्यातल्या जनतेसाठी विकासाची कामं केली आहेत. त्याचंच फळ म्हणून आज आम्हाला यश मिळत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीच्या सुरुवातीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळतांना दिसत आहे. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महायुतीला 217 जागांवर आघाडी मिळाली आहे. विजयाच्या दिशेने ही वाटचाल असल्याने आता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जाता आहे. तर पदाधिकारी नेत्यांकडून सत्ता महायुतीचीच येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी देखील यावर बोलताना, आम्ही अडीच वर्ष जे काम केलं, त्यामुळेच राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला असल्याचं म्हंटलं आहे. तर अतुल सावे हे स्वत: संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते सध्या पिछाडीवर आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी म्हंटलं की, 'हे प्रत्येक निवडणुकीतलं चित्र आहे. पहिले काही बूथ मी पिछाडीवर असतो. त्यानंतरच्या मतमोजणीत मी आघाडी घेतो. त्यामुळे अजून मतमोजणी संपलेली नाही, आम्हीच सत्ता स्थापन करू', असा विश्वास त्यांनी यावेळई बोलताना व्यक्त केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० येणार, २९ महापालिका निवडणुकीआधी महायुती डाव टाकणार?

VitaminD Risk: Vitamin D च्या अतिसेवनाने थेट किडनीवर परिणाम, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा, वाचा

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबईत धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल, केंद्र सरकराचा जबरदस्त प्लान

SCROLL FOR NEXT