BJP-Congress Clashes SaamTv
Video

Congress-BJP Clashes : धक्काबुक्की, नंतर थेट गळा पडकला; भाजप-काँग्रेसच्या २ महिला कार्यकर्त्या भिडल्या, VIDEO

Amit Shah Statement Backlash : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असतानाच आज मुंबईत भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले दिसले.

Saam Tv

संसदेत अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या या गदारोळाचे पडसाद आता राज्यात देखील उमटले आहेत. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी दुपारी अचानक शिरले. मुंबई विभागीय काँग्रेस समिती राजीव गांधी भवन येथे हा सर्व प्रकार घडला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयात तोडफोड करण्याचा देखील प्रयत्न झाला. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाना भिडले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, यावेळी जमावाकडून कार्यालयावर खुर्च्या, शाई आणि दगडफेक केली. त्यानंतर भजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असताना हा वाद टोकाला जाऊन दोन्ही पक्षातील दोन महिला कार्यकर्त्या अचानक एकमेकींना भिडल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर दोघींमध्ये तुंबळ हाणामारीही झाली. हा सर्व प्रकार पत्रकारांशी बोलताना झाला. या दोन्ही महिला कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ ही बाचाबाची झालेली दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT