A python hatchling being rescued from the handlebar of a motorcycle in Bhusawal. Saam Tv
Video

गाडी चालवताना अचानक हँडलमधून आवाज, पाहिलं तर आत लपलं होतं अजगराचं पिल्लू, पाहा थरारक VIDEO

Snake Baby Inside Motorcycle: भुसावळमध्ये दुचाकीच्या हँडल भागात अजगराचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली. सर्पमित्रांच्या मदतीने हे पिल्लू सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

Omkar Sonawane

भुसावळ : भुसावळ शहरात घडलेल्या एका अनोख्या घटनेने नागरिकांना चांगलीच धडकी भरली. शहरातील रहिवासी विनोद पाटील यांच्या दुचाकीत अचानक अजगराचे लहान पिल्लू आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हे आपल्या गाडीवरून जात असताना अचानक गाडीच्या हँडल भागातून विचित्र आवाज आल्याने त्यांनी तातडीने थांबून पाहणी केली. त्यावेळी हँडलच्या आत अजगराचे पिल्लू लपलेले असल्याचे दिसून आले. तातडीने सर्पमित्रांना बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने हे अजगराचे पिल्लू सुरक्षितरित्या दुचाकीतून बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे पाटील यांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला होता. अचानक गाडीतून साप निघाल्याची घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

Cancer vaccine: कॅन्सरविरोधी लस प्रतिबंधनासाठी नव्हे, तर आजाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती

Dashavatar Collection: एकाच दिवशी 3 मराठी चित्रपट प्रदर्शित; 'दशावतार'ने मोडले कमाईचे रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT