Bhiwandi Municipal Election Result prediction Maha exit Poll Saam TV
Video

Saam TV Exit Poll : भिवंडीत कुणाची सत्ता? ६ बिनविरोध जागा येऊनही भाजपचं काय? पाहा महाएक्झिट पोलचा अंदाज

Bhiwandi Municipal Election Exit Poll : भिवंडीत कुणाची सत्ता येणार? भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले. पण तरीही मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागणार, पाहा साम टीव्हीचा महाएक्झिट पोल....

Nandkumar Joshi

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. आता सत्ता कोणाची येणार याकडं लक्ष लागलं आहे. उद्या निवडणूक आयोग अधिकृतपणे निकाल जाहीर करणार आहे. तत्पूर्वी सकाळ माध्यम समूहानं केलेल्या सर्व्हेमध्ये कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या महापालिकेवर कुणाची सत्ता येणार, याचा अंदाज घेतला. सकाळ-सामच्या एक्झिट पोलमधून भिवंडी महापालिकेवरील सत्तागणित समोर आलं आहे.

भिवंडी महापालिकेच्या ९० जागांसाठी निवडणूक झाली. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजप १८ जागांवर विजय मिळवू शकतो. विशेष म्हणजे त्यात बिनविरोध निवडून आलेल्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणार्क आघाडी आणि इतर असे अनुक्रमे ३-३ जागांवर निवडून येऊ शकतात. या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. त्यांच्या २५ जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे सेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळू शकतो. तर समाजवादी पक्ष १८ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT