BJP leader Parinay Phuke reveals alleged ₹200 crore corruption in Bhandara Municipal Council; CM orders investigation. Saam Tv
Video

Bhandara News: भंडारा नगरपरिषदेत २०० कोटींचा भ्रष्टाचार; परिणय फुकेंचा गंभीर आरोप|VIDEO

Parinay Phuke Exposes 200 Crore Corruption: भाजप नेते परिणय फुके यांनी भंडारा नगर परिषदेत तब्बल २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चौकशी सुरू झाली असून सात दिवसांत अहवाल सादर होणार आहे.

Omkar Sonawane

नागपूर : भाजप नेते परिणय फुके यांनी भंडारा नगरपरिषदेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. २० कोटींच्या टेंडर घोटाळ्यापासून ते २०० कोटींच्या आर्थिक अनियमिततेपर्यंत अनेक प्रकरणांवर आता पडदा उघडण्याची शक्यता आहे.

फुके म्हणाले, भंडारा नगर परिषदेतील २० कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून, सात दिवसांत रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप परिणय फुके यांनी केला आहे. जीओ टॅगिंगची अट घालून २० कोटींचे टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हे काम रद्द करण्यात आले आहे.

एका नेत्याच्या नातेवाईकांच्या नावावर कंपनी चालवली जात असून, त्याच कंपनीला सर्वाधिक काम देण्यात आल्याचे फुके यांचे म्हणणे आहे. ८० ते ९० टक्के काम केवळ दोन कंपन्यांना देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. माझ्याकडे ठोस पुरावे आले आहेत. गेल्या काही वर्षांत भंडारा नगरपरिषदेत जवळपास २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधितांची नावे जाहीर करेन. या प्रकरणामुळे भंडारा राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. आता चौकशी अहवालात नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Death Case : दुर्योधन-दुशासन भेटले, मुलीच्या मदतीला एकही कृष्ण आला नाही, वडिलांचा भावनिक आक्रोश

Maharashtra Live News Update : चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

SIP Calculation: दर महिन्याला ४ हजार रुपये गुंतविल्यास १५ वर्षांनी किती फंड तयार होईल, जाणून घ्या गणित

Heart Attack: नाईट लाईटमुळे हार्ट अटॅकचा धोका 56%; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

प्रवाशांसाठी खुशखबर! फक्त एका तासात पनवेल टू कर्जत गाठा; रेल्वे कॉरिडॉचं काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT