Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Saam tv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, महत्वाचे पुरावे सादर; कोर्टात नेमकं काय झालं?

Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फोन कॉल, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्ससह डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

Alisha Khedekar

Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता हे प्रकरण चार्टशीट झाले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची प्रत न्यायालयामध्ये सादर करण्यात आली असून, संशयतांच्या स्थानांतरावर कोर्टात युक्तिवाद झाला आहे.

त्याचबरोबर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं त्याच्या डिजिटल पुराव्यांची प्रत न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे. विशेषतः संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मीक कराडचा अवादा पवन चक्कीला गेलेला फोन त्याचबरोबर व्हिडिओ ऑडिओ क्लिप; या संपूर्ण पुराव्यांची यादी आता न्यायालयामध्ये सादर केली आहे.

त्यामुळे वाल्मीक कराडसह विष्णू चाटे सुदर्शन घुले इतर आरोपींची देखील अडचण वाढली आहे आणि जिल्हा कारागृहामधील मुक्काम आणखीच वाढणार आहे. दरम्यान या प्रकरणाला वर्षे उलटली तरी सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला अद्यापही न्याय मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडेमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलच्या टँकरला आग; सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही

SCROLL FOR NEXT