Gopichand Padalkar addressing media on Beed Jail religious conversion allegations. Saam Tv
Video

Gopichand Padalkar: बीडच्या कारागृहामध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप|VIDEO

Religious Conversion Scam In Beed jail: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड कारागृहात धर्मांतर, बायबल श्लोक लेखन आणि हिंदू प्रतिमा काढल्याच्या खळबळजनक आरोपांची माहिती दिली आहे.

Omkar Sonawane

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ख्रिश्चन धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी बीड कारागृहात धर्मांतराचे काम चालते असा धक्कादायक आरोप केला आहे.गोपीचंद पडळकर म्हणाले की, बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत ते तिकडे धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकली आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबलमधील श्लोक लिहिले जातात. कैदीमध्ये भजन, कीर्तन करायचे, ते सगळे बंद करून टाकले आहेत. तसेच त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी तेथे येतो. कैदयानो तुम्ही धर्मातरण करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशी भूमिका जेल अधिकारी घेत आहेत. या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोड्या पाण्यातील वाघ! ८ फूट लांब, ३५ किलो वजन, मूळा-मुठा नदीतील 'महाशीर'चं लोणावळ्यात संवर्धन

Ind vs Aus T20 series : टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेआधी ऑलराउंडर ३ सामन्यांतून बाहेर

Chanakya Niti: आयुष्यभर पैशांसाठी झटत राहतात 'हे' लोक, कधीही होत नाही लक्ष्मीची कृपा

Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचा नवा धमाका! DP ला ठेवता येणार कव्हर फोटो, काय आहे नवीन फीचर?

Chinese Spring Dosa: चायनीज अन् साउथ इंडियन फ्यूजन, १० मिनिटांत झटपट बनवा स्प्रिंग डोसा

SCROLL FOR NEXT