BKC Metro SaamTv
Video

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Mumbai Metro News : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनला शुक्रवारी तळघरात आग लागली. याचा फटका मेट्रो सेवेला बसला असून भुयारी मेट्रोच्या बीकेसी स्थानकावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Saam Tv

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्टेशनला शुक्रवारी दुपारी आग लागली. तळघरात सुमारे 40-50 फूट खोलवर लागलेली ही आग परिसरातील लाकडी साठवणूक आणि फर्निचरमध्ये पसरली आहे. या घटनेनंतर सर्व मेट्रो तात्पुरत्या थांबवयात आल्या आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी सक्रियपणे काम करत आहेत.

निर्माणाधीन बीकेसी मेट्रोला आग लागल्याचा फटका मेट्रो सेवेला बसला असून भुयारी मेट्रोच्या बीकेसी स्थानकावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मेट्रोच काम सुरू असताना वेल्डिंगमुळे खाली ठेवलेल्या लाकडी समानाने पेट घेतला, सांगितलं जातंय की निर्माणाधीन स्थानकावरील आगीचा धूर हा BKC मेट्रो स्थानकात घुसला आणि त्यामुळे मेट्रोची सेवा विस्कळित झाली आगीमुळे आत्ता पर्यंत मेट्रोच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सध्या आगीवर ताबा मिळवण्यात आला असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे, शेलार, चाकणकर, पाटील खरातचे वऱ्हाडी, भोंदूच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर|VIDEO

New Labour Code : पगार, ओव्हरटाइममध्ये होणार बदल, १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 16 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Stampede : बिहारमध्ये देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी, ८ महिलांचा जागीच मृत्यू, १२ जणी जखमी

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT