Badlapur Panvel Tunnel Saam Tv News
Video

Video: बदलापूर- पनवेल अवघ्या 10 मिनटात प्रवास

हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत.

Rachana Bhondave

Badlpaur- Panvel News: बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आलाय. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : माहिती सादर न करणाऱ्या मुख्याध्यापकांना दणका; निवडणुकीसाठी शिक्षकांची मागविली होती माहिती, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

VIDEO : सरदेसाईंच्या पुस्तकातील दाव्याबद्दल भुजबळांनी केलं खरं खोटं, थेट कारवाईचा ईशारा | Marathi News

Maharashtra News Live Updates:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धुळ्यातील दसरा मैदान येथे सभास्थळी आगमन

House Plants : 'या' झाडांमुळे होऊ शकते त्वचेची ऍलर्जी; खिडकीत असतील तर आजच काढा घराबाहेर

Vadgaon Sheri Politics: पवार विरुद्ध पवार! पुण्यातील वडगाव शेरी मध्ये कोण ठरणार शक्तिशाली?

SCROLL FOR NEXT