badlapur news Saam tv
Video

बऱ्याच दिवसानंतर गॅस सिलिंडर मिळाला; तरुणाने काय केलं पाहा? VIDEO

badlapur news : बदलापुरातील तरुणाला बऱ्याच दिवसानंतर गॅस सिलिंडर मिळाला. त्यानंतर त्याने थेट सिलिंडरला नमस्कार केला.

Mayuresh Kadav

गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहारातील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाला बऱ्याच दिवसानंतर गॅस सिलिंडर मिळाला. त्यानंतर त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसला. त्या तरुणाने केवळ सिलिंडरला नमस्कार केला नाही, तर भावुक होऊन चुंबन देखील घेतलं. हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी २० ते २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एका सिलिंडरची किंमत काय असते, हे या तरुणाच्या कृतीतून दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT