Supporters clash intensifies ₹3 lakh counter-bounty announced against Bachchu Kadu amid viral audio row. Saam Tv
Video

Bachhu Kadu: कडूंचं वाहन फोडा आणि 3 लाख मिळवा; कोणी दिलं प्रतिआव्हान | VIDEO

Vikhe Patil Supporter Announces ₹3 lakh Bounty: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडूंनी विखेंची गाडी फोडणाऱ्यास १ लाख बक्षीस जाहीर केल्यानंतर, एका समर्थकाने कडूंची गाडी फोडणाऱ्यास ३ लाख देण्याचे प्रतिआव्हान दिले आहे.

Omkar Sonawane

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. ‘तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण तीन लाख रुपये जाहीर केले आहेत. अशी थेट धमकी एका व्यक्तीने बच्चू कडूंना फोनवर दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर, बच्चू कडूंनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून, विखे पाटलांच्या एका समर्थकाने, ज्याने स्वतःला प्रतिक कदम पाटील असे सांगितले, बच्चू कडूंना फोन करून त्यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास तीन लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, ज्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

Maharashtra Live News Update : मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

Aadhaar App: आधारचे नवे अ‍ॅप लॉंच, मोबाईलमध्येच वापरता येणार खास फिचर्स, घरबसल्या होतील सगळी कामे

Delhi Red Fort Blast: देशात खळबळ! दिल्लीत मोठा स्फोट, एकाचा मृत्यू|VIDEO

SCROLL FOR NEXT