Bachchu kadu hunger strike saam tv
Video

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन मागे, सरकारला अल्टिमेटम | VIDEO

Bachchu kadu Hunger Strike : शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज सातव्या दिवशी मागे घेतलं. सरकारकडून प्रतिनिधी म्हणून आलेल्या उदय सामंतांच्या शिष्टाईला अखेर यश आलं आहे.

Nandkumar Joshi

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस होता. त्यांची प्रकृतीही ढासळली होती. कर्जमाफीसंदर्भात आज निर्णय झाला नाही तर, १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशाराही कडूंनी दिला होता. दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती ढासळल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं. सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मी शासनाकडून लेखी पत्र आणलं आहे. तुमच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, मात्र आता बच्चू कडूंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती उदय सामंत यांची बच्चू कडू यांना केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी आज आंदोलन मागे घेत आहे, असं बच्चू कडूंनी जाहीर केलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करू. २ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं लागेल, अन्यथा सोडणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! २ मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी, सुरू कधी होणार? सरकारने थेट आदेश काढला

Bigg Boss फेम अभिनेत्याने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

Kharat Case : रूपाली चाकणकरांची आज होणार चौकशी? लेटेस्ट अपडेट समोर

SCROLL FOR NEXT