Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

Shreya Maskar

कोकण

कोकण समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकरांची पाऊलं आपोआप कोकणाकडे वळतात. कोकणात गेल्यावर तेथील बीचना नक्की भेट द्या.

Konkan | google

मुरुड बीच

रत्नागिरी येथे सुंदर मुरुड बीच वसलेला आहे. एक स्वच्छ, लोकप्रिय आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा म्हणून तो ओळखला जातो. जिथे बनाना राईड आणि जेट स्कीइंगसारख्या अनेक जलक्रीडा उपलब्ध आहेत.

Murud Beach | google

कार्दे बीच

लांब, स्वच्छ मऊ वाळू आणि सौम्य लाटांसाठी दापोलीतील कार्दे बीच ओळखला जातो. येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Karde Beach | google

लाडघर बीच

लाडघर बीच वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे 'लाल वाळूचा समुद्रकिनारा' म्हणून ओळखला जातो. हा समुद्रकिनारा डॉल्फिन दर्शन आणि जलक्रीडांसाठी लोकप्रिय आहे.

Ladghar Beach | google

आंजर्ले बीच

आंजर्ले (दापोली) समुद्रकिनाऱ्याजवळ टेकडीवर स्थित सुप्रसिद्ध 'कड्यावरचा गणपती' हे जागृत देवस्थान आहे. येथे पावसाळ्यात निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Anjarle Beach | google

केळशी बीच

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी बीच आहे. पांढरी शुभ्र वाळू, नारळ-पोफळीची झाडे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किनारा गर्दीपासून दूर निवांतपणा शोधणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

Kelshi Beach | google

हरनाई बीच

हरनाई बीच हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असलेला एक निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा आहे, जो त्याच्या सोनेरी वाळू, नारळाच्या बागा आणि ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.

Harnai Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : इतिहास, लढाया अन् परंपरा; लातूरमधील 'हे' २ किल्ले जपतात वैभवशाली वारसा

Forts In Latur | saam tv
येथे क्लिक करा...