Forts In Latur : इतिहास, लढाया अन् परंपरा; लातूरमधील 'हे' २ किल्ले जपतात वैभवशाली वारसा

Shreya Maskar

लातूर

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात औसा किल्ला आणि उदगीर किल्ला हे दोन महत्त्वाचे किल्ले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे नक्की भेट द्या.

Latur | pinterest

औसा किल्ला

औसा किल्ला हा १५-१६ व्या शतकातील 'भुईकोट' (जमिनीवरील) किल्ला असून, त्याची वास्तुकला अद्वितीय अशा तुर्की-युरोपियन शैलीची आहे.

Ausa Fort | google

उदगीर किल्ला

उदगीर किल्ला हा १२ व्या शतकातील वास्तू रचना, किल्ल्याभोवतीचे खोल खंदक आणि मराठे, निजाम यांच्यात झालेल्या तहासाठी प्रसिद्ध आहे.

Udgir Fort | google

औसा किल्ला कुणी बांधला?

औसा किल्ला बहामनी राजवटीत महमूद गवान याने इ.स. १४६६ मध्ये बांधला.

Who Built Ausa Fort? | google

औसा किल्ल्यात काय काय आहे?

औसा किल्ल्यात 'बारादरी' (खांबांचा दालन), राणी महाल, लाल महाल, पाणी महाल आणि 'परी बावडी' सारख्या विविध विहिरींचा समावेश आहे.

What Does Ausa Fort Contain? | google

उदगीर किल्ला

उदगीर किल्ला हा चौकोनी आकाराचा असून, तो एका उंच बुरुजांनी वेढलेल्या मजबूत तटबंदीचा (भुईकोट) किल्ला आहे. हा किल्ला मराठे आणि निजाम यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचा साक्षीदार आहे.

Udgir Fort | google

लातूरमधील ऐतिहासिक ठिकाणे

लातूरमध्ये या दोन किल्ल्यांसोबतच खरोसा लेणी, गंज गोलाई, सिद्धेश्वर मंदिर आणि सुरत शावली दर्गा ही प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यात भेट देऊ शकता.

Historical Places in Latur | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार, राजमाचीचे जुळे किल्ले पाहिले का?

Rajmachi Fort | google
येथे क्लिक करा...