Rajmachi Fort : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार, राजमाचीचे जुळे किल्ले पाहिले का?

Shreya Maskar

पुणे

राजमाची किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला हा किल्ला मुंबई-पुणे मार्गावर असून तो एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि ऐतिहासिक ठिकाण आहे

Pune | google

राजमाची किल्ला

राजमाची किल्ल्यावर श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन जुळे बालेकिल्ले आहेत. हे राजमाचीचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले 'उधेवाडी' हे गाव गिर्यारोहकांसाठी मुख्य विश्रांतीस्थळ म्हणून ओळखले जाते.

Rajmachi Fort | google

ट्रेकिंग

तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटक येथे आवर्जून येतात. मात्र पावसाळ्यात येथे जाणे थोडे धोक्याचे आहे.

Trekking | google

इतिहास

राजमाची किल्ला आणि कोंढाणे बौद्ध लेणी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील १६ बौद्ध लेणी आणि प्राचीन व्यापारी मार्गावर (बोरघाट) स्थित राजमाची किल्ला हे इतिहास प्रेमींसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे.

History | google

कॅम्पिंगचा आनंद

राजमाची किल्ल्यावर गेल्यावर तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. कॅम्पिंगसाठी उत्तम ठिकाण असून येथे तंबू (Tents), गावकऱ्यांची घरे आणि स्थानिक जेवणाची सोय उपलब्ध आहे.

Camping | google

मंदिर

राजमाची किल्ल्यावर, विशेषतः उधेवाडी (राजमाची गाव) भागात श्री काळभैरवनाथ मंदिर स्थित आहे. येथे तुम्हाला शांत आणि मंत्रमुग्ध वातावरण अनुभवता येईल.

Temple | google

लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाणे

लोणावळ्याजवळ अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यात लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना, कार्ला लेणी, भाजा लेणी यांचा समावेश आहे.

Lohagad | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : कोकणातील स्वर्ग! धबधबे अन् समुद्रकिनाऱ्यांची सफर; पाहा 'कणकवली'तील ५ पिकनिक स्पॉट्स

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...