Konkan Tourism : कोकणातील स्वर्ग! धबधबे अन् समुद्रकिनाऱ्यांची सफर; पाहा 'कणकवली'तील ५ पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

कणकवली

कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत आणि निसर्गरम्य शहर आहे. हिरवीगार वनराई, धबधबे आणि कोकणातील समुद्रकिनाऱ्यांजवळ असलेले हे ठिकाण फिरायला उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की जा.

Kankavli | google

प्रमुख आकर्षण

कणकवलीच्या प्रमुख आकर्षणामध्ये सावदव धबधबा, नापणे धबधबा, गगनगिरी महाराज मठ आणि तालाशिल तोंडवली समुद्रकिनारा यांचा समावेश होतो.

Waterfall | google

धबधबे

कणकवली येथील सावडाव धबधबा पोहण्यासाठी एक लोकप्रिय आणि सुरक्षित ठिकाण आहे. नापणे धबधबा, ओझर धबधबा या ठिकाणी देखील तुम्ही फिरायला जाऊ शकतो. भन्नाट फोटोशूट करा.

Waterfall | google

दाजीपूर वन्यजीव अभयारण्य

दाजीपूर वन्यजीव अभयारण्याला राधानगरी वन्यजीव अभयारण्य असेही म्हणतात. येथे तुम्हाला जवळून प्राणी-पक्षी पाहायला मिळतील.

Dajipur Wildlife Sanctuary | google

कणकवली जवळील बीच

कणकवली जवळ तालाशिल-तोंडावली आणि कोळंब हे शांत, सुंदर कोकणी समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होतो. येथे तुम्ही फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Beach | yandex

कसं जाल?

तुम्ही मुंबईहून ट्रेनने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे जाऊ शकता. कणकवली स्टेशनला उतरून तेथील पिकनिक स्पॉट फिरा.

How ​​to Get There? | google

सिंधुदुर्ग पिकनिक स्पॉट

सिंधुदुर्ग येथे फिरण्याची अनेक ठिकाणे आहेत. तारकर्ली-देवबाग बीच, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, आंबोली घाट, निवती बीच, विजयदुर्ग आणि मालवण रॉक गार्डन भेट द्या.

Sindhudurg Picnic Spots | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : उन्हाळी ट्रिपसाठी बजेट कमी आहे? मग डोंबिवलीजवळील 'ही' ५ हिल स्टेशन फिराच, मनाली-काश्मीर विसराल

Dombivli Tourism | saam tv
येथे क्लिक करा...