Surabhi Jayashree Jagdish
नाशिकपासून साधारण ७० ते ७५ किलोमीटर अंतरावर असलेलं एक सुंदर हिल स्टेशन आहे. हिरवेगार डोंगररांग, धबधबे, तलाव आणि धुक्याने भरलेलं वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करतं.
भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेलं प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. नाशिकपासून रस्त्याने साधारण २ तासांचा प्रवास करून याठिकाणी पोहोचता येतं.
भंडारदऱ्यात दाट धुकं, हिरवागार निसर्ग आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात. हिवाळ्यात इथलं तापमान साधारण १० ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्यामुळे वातावरण खूप थंड आणि प्रसन्न असतं.
भंडारदऱ्यातील भंडारदरा डॅम आणि आर्थर लेक हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण मानलं जातं. तसेच राधा वॉटरफॉल आणि अम्ब्रेला फॉल हे अतिशय सुंदर दिसणारे धबधबे आहेत.
ज्या व्यक्तींना ट्रेकिंगची आवड आहे त्यांच्यासाठी देखील खास पर्याय आहे. याठिकाणी कळसूबाई शिखर आणि रतनगड किल्ला हे देखील उत्तम पर्याय आहेत.
जून ते सप्टेंबर हा पावसाळा भंडारदरा पाहण्यासाठी सर्वात सुंदर काळ मानला जातो कारण या काळात धबधबे आणि हिरवाई पूर्ण बहरात असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान हवामान थंड आणि पर्यटनासाठी खूप आरामदायक राहतं.
नाशिकहून स्वतःच्या कारने किंवा बाईकने जाणं हा सर्वात सोयीस्कर पर्याय मानला जातो आणि प्रवासाला साधारण २ तास लागतात. इगतपुरी हे जवळचं रेल्वे स्टेशन असून तेथून टॅक्सी किंवा इतर वाहनं मिळतात.