Bachchu Kadu leading the farmers’ tractor march towards Nagpur demanding complete loan waiver. Saam Tv
Video

Bacchu Kadu: सकारात्मक निर्णय न झाल्यास रामगिरीवर कूच करणार – बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Maharashtra Farmers Warn Government: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. नागपूरकडे निघालेल्या या ‘महा एल्गार मोर्चा’त हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असून, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रामगिरीवर कूच करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. वर्धा जिल्ह्यातील सुकळी गावातून या मोर्चाला सुरुवात झाली असून राज्यभरातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत.

बच्चू कडू यांनी आजही स्वतः ट्रॅक्टर चालवत या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि कॉम्रेड अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांचे नेते सहभागी झाले आहेत. याशिवाय, बच्चू कडू यांच्या ‘महा एल्गार मोर्चा’मध्ये धनगर बांधवांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन धनगरी वेशात सहभाग नोंदवला आहे. सध्या मोर्चाने आणखी 52 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत नागपूरकडे वाटचाल सुरू केली आहे. दुपारी बच्चू कडू यांची नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राच्या मैदानावर ‘महा एल्गार सभा’ होणार आहे. तसेच दोन दिवसात कर्जमाफीचा निर्णय न केल्यास रामगिरी बंगल्याकडे आम्ही कूच करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT