Gajendra Shekhawat Saam Tv
Video

Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर केंद्र सरकारने तोडावी; शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी गजेंद्र शेखावत यांची घेतली भेट, VIDEO

Rahul Shewale: नवी दिल्ली येथे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन औरंगजेबाची कबर तोडण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत झालेला नाही. भाजपसह अनेक संघटनांनी ही कबर हटवावी अशी मागणी कायम ठेवली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद होऊन जाळपोळ आणि दंगल उफाळली.

मुघल बादशाह औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथे आहे. मात्र ही कबर पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत समाविष्ट असल्याने तिला संरक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ही कबर त्वरित हटवावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात मुसळधार पावसाचा फटका!

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

SCROLL FOR NEXT