Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद; संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर, ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर सहाव्या दिवशी देखील संभाजीनगरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद;  संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर, ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
Aurangzeb Controversy Saam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली आहे. याचपार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचसोबत संभाजीनगरमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ५ किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाने परिपत्रक जारी केले आहे. तसेच कबरीच्या परिसरात पर्यटकांना मोबाइल बाहेर न ठेवण्यास सक्त सूचना दिल्या जात आहेत. या परिसरात फोटो, रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद;  संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर, ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
Aurangzeb Tomb: कबरीच्या वादात जरांगेंची उडी; मुख्यमंत्र्यांनीच कबर फोकसला आणली, आता...,मनोज जरांगेंचा मोठा आरोप

खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गेल्या ३ आठवड्यांपासून हा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाने कबर सुरक्षित राहावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवला आहे. खुलताबाद येथे बेरिगेटिंग, कबीरच्या भोवताली उंच पत्रे आणि त्यावर तारेचे काटेरी कुंपण अशी सुरक्षा तयार केली आहे. आता त्यापुढे जाऊन सोशल मीडियावरून होणारे वाद आणि हल्ले थांबवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा पोलिसांनी नवीन पाऊल टाकले आहे. कबरीच्या परिसरात पर्यटकांना मोबाइल बाहेर न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या जात आहेत.

Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद;  संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर, ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
Aurangzeb Tomb : कबरीच्या वादात एनआयएची एण्ट्री, दंगली रोखण्यासाठी NIA अलर्ट मोडवर

औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात फोटो, रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगजेब कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले आहेत. कबरीपासून जवळपास ५० मीटर अंतरावर बॅरिकेड लावले असून तेथे सुमारे १५ पोलिसांची नेमणूक केली आहे. ५० मीटर अंतरात ४ ठिकाणी तपासणी केली जात आहे. कबर परिसरात १७ सीसीटीव्ही आहेत. कबरीच्या दोन किमी अंतरावर पोलिसांनी मुख्य चार रस्त्यांवर बॅरिकेड लावले आहेत. या प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जात आहे. कबर पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांची एका रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात आहे. यात नाव, कुठून आले, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड किंवा पॅनकार्डची नोंद केली जात आहे. मोबाइल बाहेरच ठेवण्यास सांगितले जात आहे.

Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद;  संभाजीनगर पोलिस अलर्ट मोडवर, ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
Aurangzeb Tomb : कबरीचा वाद, सुरक्षेत वाढ; औरंग्याच्या कबरीच्या सुरक्षेसाठी सरकारला किती खर्च आलाय? वाचा आकडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com