Aurangzeb Tomb : कबरीच्या वादात एनआयएची एण्ट्री, दंगली रोखण्यासाठी NIA अलर्ट मोडवर

Aurangzeb Controversy : औरंगजेबाच्या कबरीच्या वादात आता थेट एनआयएची एण्ट्री झालीय.. मात्र त्याचं कारण काय? एनआयएला उशीरा जाग आलीय का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Aurangzeb Controversy
Aurangzeb Controversy Saam Tv
Published On

क्रुरकर्मा औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरात दंगलीची ठिणगी पडली.. तर आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतलंय. नागपूर दंगलीचं बांग्लादेश कनेक्शन समोर आल्यानंतर एनआयएची टीम थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. तर फक्त संभाजीनगरच नाही तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड आणि उदगीरचाही एनआयए टीम दौरा करत संवेदनशील भागांवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचं समोर आलंय...मात्र हे प्रकरण कसं सुरु झालं? पाहूयात...

- छावा सिनेमानंतर लोकांच्या औरंगजेबाविषयी तीव्र भावना

- केंद्राकडून औरंगजेबाच्या कबरीवर 6.5 लाखांचा खर्च केल्याचं समोर

- भाजप खासदार उदयनराजेंकडून कबर उखडून टाकण्याची भाषा

- हिंदूत्ववादी संघटनांकडून कबर हटवण्याची आग्रही मागणी

17 मार्च

- नागपूरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन

- नागपूरात रात्री दोन गटात दगडफेक आणि जाळपोळीची घटना

Aurangzeb Controversy
Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीचा चेंडू आता थेट कोर्टात; लहान मुलांचं कारण देत 'याचिका'च दाखल केली

17 मार्चला नागपूरात दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडल्यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आलंय.. त्यापार्श्वभुमीवर प्रशासनाने नेमकी काय उपाययोजना केल्यात? पाहूयात...

- नागपूर दंगलीनंतर पुन्हा जमावबंदी

- औरंगजेबाच्या कबरीला पत्र्याची सुरक्षा भिंत

- खुल्ताबाद परिसरात ड्रोन उडवण्यावर बंदी

- एनआयकडून स्थानिक पोलिसांशी चर्चा

Aurangzeb Controversy
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

औरंगजेबाच्या कबरीचा वाद नागपूरच्या दंगलीपर्यंत पोहचला... नागपूर पाठोपाठ मराठवाडा पेटू नये म्हणून एनआयए अॅक्शन मोडवर आली असली तरी खरंतर एनआयएनं कायम अलर्ट मोडवर असलं पाहिजे.. मात्र सध्या अचानक जाग आलेल्या एनआयएचं वरातीमागून घोडं, अशीच स्थिती झालीय. त्यामुळे आतातरी राज्यातील सामाजिक सलोखा राखण्यास एनआयएला यश मिळणार का? याकडे लक्ष लागलंय....

Aurangzeb Controversy
Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारला येतोय लाखोंनी खर्च, आकडे पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com