Vitthal Rukmini Temple saam tv
Video

Pandharpur News: आषाढीवारी आधीच पंढरपूरमध्ये तणाव; विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ|VIDEO

Ashadhi Wari Preparations : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियोजन बैठक आज पार पडत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली.

बैठकीदरम्यान, काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मंदिर प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. त्यांनी BVG कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली. कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, सर्वसामान्य भाविकांच्या देणग्यांमधून कोट्यवधी रुपये खर्च करून ठेका देण्याऐवजी, सेवाभावीवृत्तीने काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्यावी.

या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी मंदिरामध्ये तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती. काही वेळासाठी बैठक अडथळ्यांत सापडली होती. मात्र, पोलिस दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि बैठक पुन्हा सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

SCROLL FOR NEXT