Students dressed as Warkaris during Ashadhi Ekadashi Dindi at ZP School, Papri – celebrating devotion, tradition, and culture. Saam Tv
Video

Ashadh Wari: ८६० बाल वारकऱ्यांनी सजवली विठ्ठलनामाची दिंडी; ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात गाव निनादलं|VIDEO

Ashadhi Ekadashi 2025: मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेने आषाढी एकादशीनिमित्त ८६० विद्यार्थ्यांसह भव्य बाल दिंडीचे आयोजन केले. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदंग, गोल रिंगण आणि वारीची अनुभूती दिली.

Omkar Sonawane

सोलापूर: येथील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आगामी दिवसांत येणाऱ्या आषाढी एकादशी वारी निमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन केल. या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा, बंडी, धोतर या पोशाखात मुले तर रंगबिरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणाची साथ, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा रुख्मीनीचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले.

दिंडीत शाळेतील इयत्ता १ली ते ८ वी च्या सुमारे ८६० हुन अधिक बालवारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक आणि हुभेहुब वेशभूषा केल्याचं दिसून आलं.

दरम्यान,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला. चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. गावातून विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी शाळेच्या प्रांगणात आल्यावर प्रत्यक्ष वारीत ज्या प्रमाणे अश्वाचे गोल रिंगण केले जाते तसे गोल रिंगण आयोजित केले होते, या गोल रिंगणसोहळ्यात अश्वामागे बाल वारकऱ्यांसमवेत शाळेतील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ आणि पालकही धावले.

बाल वारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच मानवी मनोरे रचत त्यावर पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते, स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात, दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते. बाल वारकऱ्यांच्या या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT