Ashadh Wari: विठुरायाच्या नामस्मरणाने दुमदुमली शाळा; विद्यार्थ्यांनी फुगडी, गोल रिंगणातून साजरी केली आषाढी एकादशी | VIDEO

Ashadhi Ekadashi celebration in schools in Nashik: नाशिकच्या फ्रावशी टॉऊन अकॅडमीत आषाढी एकादशीनिमित्त ४०० विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात दिंडीत सहभाग घेत भक्तीमय वातावरण निर्माण केलं.

तबरेज शेख, साम टीव्ही

नाशिक: आषाढी एकादशी निमित्त आज नाशिकच्या फ्रावशी टॉऊन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आजोजन करण्यात आलंय. गेल्या आठ वर्षांपासून दिंडीला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जवळपास ४००विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केलीये.

यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विठ्ठलाचे रुक्मणीची वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतलं तर वासुदेवाच्या वेशभूषाचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता. शाळेतील संचालक सह शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विध्यार्थीनामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तीमय झालेल्या दिसून आलं. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात एकच व पंढरपूर भेटीचे स्वरूप प्राप्त झालंय त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com