MLA Arjun Khotkar reacts sharply to Kailas Gorantyal BJP entry sparks political storm in Jalna Saam Tv
Video

Maharashtra Politics: खरा गद्दार कोण? कैलास गोरंट्याल याच्या भाजप प्रवेशावर आमदार अर्जुन खोतकरांचा घणाघात|VIDEO

Political Earthquake in Jalna: काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच जालना जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या प्रवेशावर आमदार अर्जुन खोतकर यांनी गोरंट्यालांना गद्दार म्हणत भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे.

Omkar Sonawane

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जालन्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट प्रतिक्रिया देत गोरंट्यालांवर जोरदार निशाणा साधला आहे.

आज अखेर गोरंट्यालांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पण मला आठवतं, मी जेव्हा मूळ शिवसेनेत गेलो आणि धनुष्यबाणासोबत राहिलो, तेव्हा याच गोरंट्यालांनी मला 'गद्दार' म्हटलं होतं. आज खरं गद्दार कोण? काँग्रेसने त्यांना इतकी वर्ष आमदारकी नेतेपद दिलं आणि शेवटी त्यांनीच साथ सोडली, असं खोतकर म्हणाले.

खोतकरांनी गोरंट्यालांच्या भाजप प्रवेशामागे भ्रष्टाचार लपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. "नगरपालिकेची चौकशी सुरू आहे. त्यात अनेक घोटाळे उघड झालेत. आता त्यातून सुटका मिळवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा घणाघात खोतकरांनी केला.

लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी... हीच नीती या लोकांची आहे. आधीपासूनच त्यांचे संबंध भाजपसोबत होते, ते अनैतिक होते. आता त्यांनी त्यावर शिक्कामोर्तबच केलं, असा आरोपही त्यांनी केला. तसेच गोरंट्यालांच्या प्रवेशावेळी दोन सहकाऱ्यांचा उल्लेख झाला होता, त्यावर खोतकर म्हणाले, ते दोघे आजही माझ्यासोबत आहेत. फक्त खोटा प्रचार करण्याचं काम हे लोक करत आहेत. सुरुवात आम्ही केली नाही, सुरुवात तुम्ही केली... घोडा मैदान पुढे आहे. आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा देत खोतकरांनी राजकीय संघर्षाची नांदीच दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT