Anjali Damania has sent a legal notice to Maharashtra CM Devendra Fadnavis saam tv
Video

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

Anjali Damania legal notice to CM Fadnavis over Satpuda bungalow : मंत्रिपद गेल्यानंतरही सातपुडा हा सरकारी बंगला धनंजय मुंडे यांनी सोडला नाही. अजूनही ते या बंगल्यातच आहेत. यावरून आता अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Nandkumar Joshi

राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांनी सातपुडा हा सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. मंत्रिपदी नसताना ते अद्याप या सरकारी बंगल्यावर वास्तव्यास आहेत. त्यामुळं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

विविध आरोपांची राळ उठल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंडे हे मंत्रिपदी असताना सातपुडा या सरकारी बंगल्यात राहत होते. आता मंत्रिपद जाऊन अनेक महिने लोटले आहेत. त्यानंतरही ते सातपुडा या सरकारी निवासस्थानी वास्तव्यास आहेत. त्यांनी अद्याप बंगला रिकामा केला नाही. यावरून राजकारणही पेटले होते. अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले होते. दोनच दिवसांपूर्वी दमानिया यांनी हा बंगला रिकामा करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. या कालावधीत मुंडेंनी बंगला रिकामा केला नाही तर कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल, असं सांगितलं होतं. मुंडेंनी हा बंगला रिकामा करावा यासाठी दमानिया यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT